नशिराबाद ग्रामपंचायत कर्मचारी सेवानिवृत्त; ग्रामपंचायत सदस्य प्रदिप साळी यांच्याहस्ते सत्कार

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील ग्रामपंचायत कर्मचारी उखर्डू बिऱ्हाडे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत सदस्य प्रदिप माळी यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार आज मंगळवारी सायंकाळी करण्यात आला.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील नशिराबाद ग्रामपंचायत कर्मचारी उखर्डू बिऱ्हाडे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. ३५ वर्षांपासून ते ग्रामपंचायत रूजू होते. ३५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आपली कर्तव्ये चोखपणे बजावली. आपण एक मागासवर्गीय असल्याने काल सोमवारी सेवानिवृत्त कार्यक्रमाला हजर नव्हते. दरम्यान ही बाब ग्रामविकास अधिकारी बी.एस.पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य तथा झीअम फाऊडेशनचे अध्यक्ष प्रदीप माळी यांना समजली. त्यांनी याची दखल घेत सेवानिवृत्त कर्मचारी उखर्डू बिऱ्हाडे यांना बोलावून ग्रामपंचायत कार्यालयात शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. इतकी वर्ष सेवा करत असतांना गावात कुठेही वाद केला नाही. आपले काम कर्तव्य समजून सफाई कर्मचारी म्हणून सेवा दिली. त्यांच्या भावी आयुष्य चांगले जावे यासाठी गावातील नागरीकांसह ग्रामपंचायत अधिकारी व सदस्यांनी भावपूर्ण निरोप दिला.

 

Protected Content