महिलेची दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला अटक; शहर पोलीसांची कामगिरी !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील दत्तवाडी येथील तरूणीची घरासमोर पार्किंगला लावलेली दुचाकी एकाने चोरून नेल्याचे १४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता समोर आले आहे. अखेर शुक्रवारी ३ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याला अटक करण्यात आली आहे. कोमलसिंग विजयसिंग राजपूत वय २५ रा. चाळीसगाव असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, करिश्मा दिनेश छोरीया वय ३२ रा. दत्तवाडी चाळीसगाव या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १३ एप्रिल रोजी रात्री ८ ते १४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीवाय २७७१) ही घरासमोर पार्कींगला लावलेली होती. त्यावेळी मध्यरात्री संशयित आरोपी कोमलसिंग राजपूत याने ही दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर करिश्मा छोरीया व त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळून आली नाही. अखेर शुक्रवारी ३ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता चाळीसगाव शहर पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच शहर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी कोमलसिंग विजयसिंग राजपूत वय २५ रा. चाळीसगाव याने दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला पोलीसांनी अटक केले आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील हे करीत आहे.

Protected Content