चहा विक्रेत्याची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील चिंचोली गावातील विठ्ठल मंदीरा समारील मोकळ्या जागेतून चहा विक्रेत्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २१ एप्रिल मध्यरात्री २ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी ३ मे रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, गोपाल रमेश पाटील वय-४० रा. कुसुंबा ता. जळगाव हा तरूण चहा हॉटेल चालवून आपला उदरनिर्वाह करतात. २० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता ते जळगाव तालुक्यातील चिंचोली गावात दुचाकी क्रमांक (एमएच १० बीबी ३२७८) ने कामानिमित्त आलेले होते. त्यावेळी त्यांनी चिंचोली गावातील विठ्ठल मंदीर परिसरातील मोकळ्या जागेत दुचाकी पार्कींगला लावलेली होती. दरम्यान २१ मे रोजी मध्यरात्री २ वाजता अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शुक्रवारी ३ मे रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार हे करीत आहे.

Protected Content