डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रोम नाईट व होम बॅण्डनी गॅदरिंगमध्ये धुम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय प्रस्तुत अ‍ॅन्युअल गॅदरिंगमध्ये मंगळवार १० एप्रिल रोजी क्विज कॉम्पीटीशन व रात्री प्रॉम नाईट व होम बॅण्डद्वारे विविध गीतप्रकार व नृत्यप्रकार सादर करण्यात आले. भावी डॉक्टरांनी गॅदरिंगमधील विविध प्रकारात सहभाग घेऊन आनंद लुटला. यात कॅसिओ गिटारच्या साथीवर दर्जेदार गीतांचे सादरीकरणही झाले. उत्‍तरोत्‍तर कार्यक्रम रंगत गेला.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील किवा तेवन येथे गॅदरिंगसाठी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विद्युत रोषणाईद्वारे सेल्फी पॉईंट देखील तयार केले होते. वार्षिक गॅदरिंगचा दुसर्‍या दिवशी विद्यार्थ्यांनी जल्‍लौष केला. यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, प्रो.डॉ.अनंत बेंडाळे, डॉ.पाराजी बाचेवार, डॉ.नेहा वझे, डॉ.विक्रांत वझे, डॉ.विठ्ठल शिंदे, डॉ.बापूराव बिटे यांच्यासह सर्वच डॉक्टर्स व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

होमबॅण्डवर गीतांचे सादरीकरण झाले यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांनी खामोशिया तर डॉ.विक्रांत वझे यांनी तेरी दिवानी हे गीत गाऊन विद्यार्थ्यांच्या पार्टीची शोभा वाढविली. विद्युत रोषणाईने किवा तेवनचा परिसर झळाळून निघाला. होम बॅण्डमध्ये आकाश सोनार (ड्रमर), प्रतिक सुरवाडे, साहिल सुतार (कॅसिओ), चैतश्री चोरडिया (गिटारीस्ट), विशाल नरवाडे (गिटारीस्ट), आर्या नाईक, डॉ.प्रफुल्‍ल जगताप, डॉ.दिशांत पाटील यांनी सिगिंग केले. याशिवाय विविध गेम्स झाले. बॉल डान्सचेही उत्कृष्ट सादरीकरण भावी डॉक्टरांनी केले. सूत्रसंचालन अमित साखरे, बुशरा खान, वसुधा चव्हाण, आदित्य दांडगे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रोम नाईट्स शौनक, सुदिक्षा धरणे, आयमन, रोहित पाटील, प्रथमेश गव्हाळे, शशांक साखरे, जान्हवी मापारी यांनी केले.

ओ रंगरेज…आ जाओ मेरी तमन्ना
गॅदरिंगमध्ये चाहुल मानकर हिने लवली, आकाश व वरदा यांनी तु ही है आशिकी, ओंकार याने ओ रंगरेज, प्रतिक सुरवाडे याने जनम जनम, शुभानने मेरी मेहबुब, खुशी हिने तुम्ही हो बंधू, स्वरुपने बेखयाली, साहिल व देवाशिषने बासरी व पॅनो वाजवून आओग जब तुम व जिया धडक धडक, शर्वरीने परेशान हे गीत, आर्याने परफेक्ट, शिवांशने दिल इबादत, चैतश्रीने हारीया मे दिल हारिया, स्वराजने जालीमा ओ जालीमा, अवंतीने जरा जरा, अब्दुलने आ जाओ मेरी तमन्ना असे विविध गीत उत्स्फूर्तपणे सादर करण्यात आले. अनेक गीतांना वन्स मोअर देऊ्न कार्यक्रम रात्री उत्‍तरोत्‍तर रंगत गेला.

Protected Content