करियर निवडतांना आधी स्वतःचा बेस घट्ट करा – हेमाली मोहिते

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पत्रकारिता, शिक्षण आणि खेळ हे तीनही क्षेत्र अतिशय माहितीपूर्ण असल्याने या क्षेत्रात पदार्पण करत असाल तर आधी स्वतःचा पाया घट्ट करा. या क्षेत्राची आपल्याला अद्यायावयत माहिती असेल तर यात करियरच्या संधी चालून येतील असे विचार झी-24 तास या वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका हेमाली मोहिते यांनी एकदिवसीय ऑनलाईन परिषदेत मांडले.

 

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, मुळजी जेठा महाविद्यालय यांच्या विद्यमाने जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग व शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय  तर्फे सोमवार 20 मार्च रोजी एकदिवसीय ऑनलाईन राष्टीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.या परिषदेत पत्रकारिता, शिक्षण, आणि खेळ या विषयावर  लोकमत न्यूज 18 चे विशाल पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक मिडियातील संधी, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, खिरोदा येथील प्रा.साहेबराव भूकन यांनी शिक्षण आणि संधी, नवी दिल्ली येथील पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले कंटेंट रायटर प्रशांत शिरसाळे यांनी  कंटेंट रायटिंग क्षेत्रातील संधी व पत्रकार विशाल चढा यांनी टेक्निकल सेशन तर डॉ. सोमनाथ  वडनेरे यांनी क्रीडा पत्रकारिता  या विषयावर मार्गदर्शन केले.उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी तर प्रास्ताविक प्रा.संदीप केदार यांनी केले.कार्यशाळेचे आभार प्रा. किसन पावरा यांनी मानले. या परिषदेेसाठी के.सी.ई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, मु.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय भारंबे, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या परिषदेचे समन्वयक म्हणून शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा.डॉ. केतन चौधरी, प्रा. डॉ निलेश जोशी आणि जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा संदीप केदार यांनी जबाबदारी सांभाळली.

Protected Content