दीपस्तंभ मनोबल प्रकल्प इमारतीचे भूमिपूजन

जळगाव प्रतिनिधी । दीपस्तंभ मनोबल प्रकल्पाच्या इमारतीचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, रतनलाल सी. बाफना, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी.पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, आर्किटेक्ट शरद महाजन उपस्थित होते. प्रास्ताविक यजुर्वेन्द्र महाजन यांनी केले.
या वेळी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर म्हणाले की, मनोबल प्रकल्प देशात आदर्श ठरेल, येथून प्रेरणा घायला देशभरातून लोक येतील असे सांगितले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे काही कारणास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र याप्रसंगी त्यांचा व्हिडीओ संदेश ऐकविण्यात आला. रतनलाल बाफना यांनी आपल्या मनोगतातून या केंद्रासाठी सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही दिली.

दरम्यान, मनोबल प्रकल्पातील माजी दिव्यांग विद्यार्थीनी रिना कैलास बारेला यांनी संस्थेला १० हजार रुपये देणगी दिली. तसेच पुणे येथील घनश्याम मारणे यांच्या राष्ट्रीय स्विमिंग चॅम्पियन मुलगा दिव्यांग असून त्यांनी बक्षिसाची रक्कम बांधकामासाठी भेट दिली. जानेफळ येथील १०० शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या प्रकल्पासाठी १ लाख २१ हजार रुपये निधी दिला. राजेंद्र चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

Add Comment

Protected Content