माजी काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले संजय निरूपम यांनी ३ मे रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. २० वर्षांनंतर त्यांची शिवसेनेते घरवापसी झाली आहे. २००५ साली त्यांनी शिवसेना सोडली होती. त्यानंतर पुन्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी संजय निरूपम म्हणाले की, माझ्यासोबत ४००-५०० कार्यकर्ते, पदाधिकारी यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. २० वर्षानंतर आज मी स्वगृही परत येत आणि एकटा नाही, तर संपूर्ण कुटुंबासह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी आज खूप आनंदी आहे. माझ्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. माझ्या रक्तात बाळासाहेबांचे विचार आहेत.

गेल्या 20 वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये होतो, २००५ मध्ये मी शिवसेनेतून बाहेर गेलो. काँग्रेसमध्ये राहून बाळासाहेबांच्या विचाराने काम करण्यात अडचण येत होती, ती अडचण आता आम्ही दूर केली आहे. मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाल्यामुळे त्यांनी अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली होती. या कारणामुळे संजय निरूपम नाराज होते. या मतदारसंघातून ते उमेदवारीसाठी इच्छूक होते. त्यांच्या या विरोधी सुरामुळे काँग्रेस पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनी ३ मे रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

 

Protected Content