हैदराबाद एनकाऊंटर : आरोपींच्या मृतदेहांचे पुन्हा शवविच्छेदन करा – तेलंगणा हायकोर्ट

Landmark Supreme Court Judgment Mary Roy v. The State of Kerala 1

हैदराबाद वृत्तसंस्था । हैदराबादमधील महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार आरोपींचे एनकाऊंटर प्रकरण दररोज नवनवे वळण घेताना दिसत आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने एनकाऊंटरवर प्रश्न उपस्थित करत चारही आरोपींच्या मृतदेहांचे पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉक्टर दिशाच्या खुनात आरोपी असलेल्या चौघांचाही पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने आरोपींचे मृतदेह हैदराबादमधील गांधी रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. मात्र, ते आणखी जास्त काळ ठेवता येणार नसल्याने त्याबाबत पुढील निर्देश द्या, अशी मागणी रुग्णालय प्रशासनाने न्यायालयात केली होती. त्यावर सुनावणी करताना तेलंगणा उच्च न्यायालयाने एनकाऊंटरवर प्रश्न उपस्थित करत चारही आरोपींच्या मृतदेहांचे पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले आहेत. एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच त्रिसदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे.

Protected Content