डॉ. उल्हास पाटील कोविड रूग्णालयातील अधिग्रहीत खाटा पुर्ण क्षमतेने वापरण्यावर विचार – जिल्हाधिकारी

जळगाव प्रतिनिधी । कोरोनासाठी जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत केलेल्या डॉ. उल्हास पाटील कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देऊन रूग्णांना मिळणार्‍या सुविधांविषयी पाहणी केली. दरम्यान रूग्णालयातील इतरही अधिग्रहीत खाटा पुर्ण क्षमतेने वापरण्याविषयी चर्चा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यासोबतच रूग्णांना मिळणार्‍या आरोग्य सुविधांविषयीचा आढावा देखिल प्रशासनाकडून घेतला जात आहे. कोरोना बाधित, संशयित रूग्णांना कोविड सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रशासनाकडुन प्रयत्न सुरू आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील ४०० खाटा कोविडसाठी अधिग्रहीत केल्या आहेत. याठिकाणी जवळपास २५० कोरोना बाधित रूग्ण उपचार घेत आहे. यावेळी डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, प्रशासन अधिकारी आशिष भिरूड, एन.जी. चौधरी आदी उपस्थित होते.

Protected Content