यावल वनक्षेत्रातील निंबादेवी जंगलात अवैध खैर जातीचे लाकूड जप्त; अज्ञातावर गुन्हा दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यात वृक्षतोड माफियाच्या विरूद्ध वनविभागाच्या कार्यवाहीचे सत्र सुरूच असुन, यावल पश्चिम क्षेत्राच्या सामूहिक पथक हे गस्त करीत असताना नाल्यात अवैधरित्या तोड केलेला खैर मिळून आला. आजूबाजूस फिरून पाहणी केली असता आरोपी मिळून आला नाही. सदरील मुद्देमाल मोजमाप केले असता खैर नग ५१ घन मिटर असून त्याची १२१९.किंमत २५५८४ इतकी असून, वनरक्षक निंबादेवी यांनी प्र. रि. क्र. ४/२०२४ १ एप्रिल रोजी जारी केला. सदरील मुद्देमाल खाजगी वाहनाने वाहतूक करून मुख्य् विक्री केंद्र यावल येथे ताबा पावतीने जमा केले. सदर गुन्हे प्रकणावर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६/१/ अ, फ़ अन्वये अज्ञात व्यक्ति विरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.

सदरची कार्यवाहीत वनक्षेत्र यावल पश्चीम क्षेत्राच्या पथकात सहभाग घेतला. ही निनु सोमराज वनसंरक्षक धुळे प्रादेशिक जमीर शेख, राजेन्द्र सादगिर विभागीय वनअधिकारी (दक्षता) धुळे, प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्पा यावल, पश्चिम वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल यावल सुनिल भिलावे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल विजय बोराडे हे करीत आहेत सदरच्या या कार्यवाहित वनपाल विजय बोराडे व विपुल पाटील, वनरक्षक अक्षय रोकडे, हनुमंत सोनवणे,सुधीर पटणे, चेतन शेलार,अशोक राठोड व रोपवन संरक्षण मजूर, फायर वॉचर सहभागी होते. वनक्षेत्रपाल यावलं पश्चिम, यावल वनविभाग जळगाव यांच्याकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच लाकूड वाहतूकसंबधित कुठला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री १९२६ या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content