दोन चोरटयांनी चोरलेल्या चार मोटरसायकली जप्त; रावेर पोलिसांची कारवाई

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता.त्यांच्या कडून विविध ठिकाणा वरुन चोरलेल्या एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकल हस्तगत केल्या आहे.यामुळे नागरीकां मधुन समाधन व्यक्त होत आहे.

या बाबत वृत्त असे की नांदुरपिंप्री ता मुक्ताईनगर येथील लिलाधर पाटील यांची मोटरसायकल चोरी प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्हाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता.जळगाव येथून आरोपी चंद्रकांत रामदास साळुंखे तर वढोदा ता यावल येथून आरोपी भरत गणेश सोनवणे यांना ताब्यात घेत चौकशी केली असता.

दोघांकडून ४० हजार किमतीची हिरो होंडा कंपनीची एमएच १९ बीके ९४४८ तसेच ३५ हजार किमतीची हिरो होंडा एचएफ डीलक्स विना नंबर प्लेट तसेच ३० हजार किमतीची प्लेटीना एमएच १९ डीओ ८७३८ तसेच ३५ हजार किमतीची टीव्हीएस स्टार सिटी MP १२ MC २५७० या चार मोटर सायकली ताब्यात घेण्यात आल्या आहे.वरील कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक ईश्वर चव्हाण, सुरेश मेढेपोकॉ,समाधान ठाकुर,सचिन घुगे,विशाल पाटील, प्रमोद पाटील,अमोल जाधव,महेश मोगरे,विकार शेख,सुकेश तडवी यांच्या पथकाने कार्यवाई केली आहे.

Protected Content