आंध्र प्रदेशाच्या मुख्यमंत्री यांच्या बहीणीला काँग्रेसकडून उमेदवारी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आणि वाय.एस.आर. काँग्रेसचे प्रमुख वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला रेड्डी यांना काँग्रेसने आंध्र प्रदेशातील कडप्पा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांनी गेल्या वर्षी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करून प्रवेश केला आहे. त्या जगन मोहन रेड्डी यांच्या धाकट्या बहीणी आहे.

काँग्रेसने २ एप्रिल रोजी आज लोकसभा निवडणूकीची अकरावी यादी जाहीर केली आहे. या यादीत आंध्र प्रदेश राज्याच्या व्यतिरिक्त बिहार, उडीसा आणि पश्चिम बंगाल या राज्यातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. काँग्रेसने आतापर्यंत २३१ उमेदवार जाहीर केले आहे.

Protected Content