फैजपूर येथे ‘जिओ या पिओ’ व ‘जलक्रांती अभियान’ या दोन डॉक्युमेंट्रींंचे विमोचन

5db39c0f 1902 45ba aa57 7ed96443ee32

फैजपूर, प्रतिनिधी | येथील स्वामीनारायण गुरुकुलच्या एका माजी विद्यार्थिनीने गुरुकुलचे संस्थापक शास्त्री भक्ती प्रकाशदास यांच्या वाढदिवसाला अनोखी भेट देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मंगळवारी मोहिनी नेहेते (रा. भालोद) या विद्यार्थिनीने व्यसनाधिनतेवर प्रहार करणारी ‘जिओ या पिओ’ तसेच यावल रावेर तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या ‘थेंब अमृताचा जलक्रांती अभियान’ या दोन ज्वलंत विषयावर केलेल्या डाक्यूमेंट्री चे विमोचन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

मंगळवारी येथील स्वामीनारायण गुरुकुल संस्थेचे गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री भक्ती किशोर दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष शास्त्री भक्ती प्रकाश यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माजी विद्यार्थिनी मोहिनी नेहते हिने नुकत्याच पार पडलेल्या थेंब अमृताचा जलक्रांती अभियान या विषयावर ११ मिनिटांची डॉक्युमेंटरी तयार करून भविष्यात पाण्याचे महत्त्व व ‘जल है तो कल है’ या विषयावर भाष्य केले आहे. तसेच सध्या तरुण पिढीला व्यसनाधीनतेने ग्रासलेले असून व्यसनापासून तरुण पिढी व समाज दूर व्हावा यासाठी तिने ग्रामीण कलाकारांच्या माध्यमातून या ‘जिओ या पिओ’ डॉक्युमेंटरीचे निर्माण केले आहे.  या डाक्यूमेंट्री विमोचन गुरुकुलचे अध्यक्ष स्वामी; भक्ती प्रकाश यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत करून त्यांना एक प्रकारे मोहिनी हिने गुरुदक्षिणा दिली आहे.  या कार्यक्रमाला कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार हरिभाऊ जावळे, फैजपूर नगराध्यक्ष महानंदा होले, जलक्रांती अभियानाचे मार्गदर्शक मधुकर पाटील, सुरेश शास्त्री मानेकर महाराज, शास्त्री भक्ती स्वरूप दास, डॉ. व्ही. जी. वारके, प्राचार्य संजय वाघुळदे, गुरुकुल चे संचालक पी. डी. पाटील ,यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वतः मोहिनी नेहते हिने केले तर सुत्रसंचलन दिपमाला दाणी यांनी केले.

Protected Content