अंकलेश्वर – बऱ्हाणपूर महामार्ग नूतनीकरणासाठी केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

यावल – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अंकलेश्वर बुऱ्हाणपूर याच मार्गाचे भौगोलिकदृष्ट्या चौपदरीकरण आणि ते शक्य नसेल तर रुंदीकरण, दर्जोन्नतीकरण आणि संपूर्णपणे नूतनीकरण करण्यात यावे. अशी या मागणीसाठी डॉ.सुनिल पाटील आणि भाजपा कार्यकर्ते यांना केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी निवेदन दिले.

जामनेर येथे आ.गिरीश महाजन यांच्या सुकन्या यांच्या विवाह निमित्ताने प्रत्यक्ष भेट घेऊन साकळी तालुका यावल येथील भाजपा कार्यकर्ते डॉ. सुनिल पाटील यांनी निवेदन हे दिले. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रकल्प शासनाच्या विचाराधीन असून DPR झालेला आहे. काही तांत्रिक अडचणी दूर झाल्यावर कामकाज निश्चित पूर्ण होईल, असे आश्वासन ना. नितिन गडकरी यांनी दिले आहे.

या निवेदनात, “येथील तालुक्यातील गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन प्रमुख राज्यांना जोडला जाणाऱ्या अंकलेश्वर- बऱ्हाणपूर या राज्यमार्ग चारला ‘NH 753 B’ नामकरण करून राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जा गेल्यावर्षी केंद्रीय रस्ते , परिवहन व महामार्ग विकास मंत्रालयाने दिला आहे. तथापि सदरील महामार्गातील तळोदा – शहादा – शिरपूर- चोपडा – यावल – रावेर या जवळपास २४० कि. मी.रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे व अरुंद रस्त्यामुळे वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत असून वाहन धारकांना प्रवास करतांना नेहमीच जीव मुठीत धरून व डोळ्यात तेल घालून तारेवरची कसरत करावी लागते.

गुजरात राज्याचे वाढते औदयोगिकरण, उत्तर महाराष्ट्रातील कृषी उत्पादनाची वाहतूक, रस्त्यालगत असलेल्या तीन राज्यातील मोठया बाजारपेठांची शहरे व गावे यामुळें हा रस्ता खूपच महत्वाचा, रहदारीचा आणि अवजड वाहनांचा मार्ग आहे. बऱ्याच वेळेस रस्ताच्या दुर्दशेमुळे अनेक गंभीर स्वरूपाचे अपघात होवून आतापर्यंत हजारोंच्या संख्येने निरपराध नागरीकांची जीवितहानी सुध्दा झालेली आहे. त्यामुळे वाहनधारक, प्रवासी व नागरिकांमध्ये नेहमीच संताप व्यक्त होतो. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत थोड्याफार प्रमाणात अत्यल्प निधीनुसार १५ ते २० कि. मी.अंतराचे टप्पे टप्पे रस्ता दुरुस्ती केली जाते. पण ती दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी टिकेल अशा स्वरूपाची त्यांची गुणवत्ता नसून कामचलाऊ व तात्पुरती असते.

तरी केंद्रीयमंत्री ना.नितीन गडकरी यांनी विकासाभिमुख, दूरदृष्टीकोणातून भारतात अनेक रस्ते, महामार्ग, महाराष्ट्रातही समृद्धी महामार्ग, पालखी मार्ग, सागरी वाहतूक अश्या प्रकारे अनेक रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे मात्र अंकलेश्वर बुऱ्हाणपूर याच मार्गासाठी अजूनपर्यंत काहीही प्रगती होतांना दिसत नाही. भौगोलिकदृष्ट्या चौपदरीकरण शक्य नसेल तर रुंदीकरण, दर्जोन्नतीकरण आणि संपूर्णपणे नूतनीकरण (दोन पदरीकरण का असेना) या मार्गाचे काम करण्यात यावे.” अशी मागणी करीत आपले निवेदन डॉ.पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांसोबत दिले.

Protected Content