पाचोरा तालुका औद्योगिक वसाहतीच्या चेअरमनपदी तावडे तर व्हाईस चेअरमनपदी अग्रवाल

पाचोरा – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुका औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत चेअरमनपदी एकनाथ तावडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी मुकेश अग्रवाल यांची निवड करण्यात आली.

आज सोमवार, दि.२१ मार्च रोजी पाचोरा तालुका औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. यात चेअरमन पदासाठी एकनाथ तावडे तर व्हाईस चेअरमन पदासाठी मुकेश अग्रवाल या दोघांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी व्ही.एम.जगताप यांनी चेअरमनपदी एकनाथ तावडे तर व्हाईस चेअरमनपदी मुकेश अग्रवाल यांची बिनविरोध निवड घोषित केली आहे.

या संस्थेच्या निवडणूकीत पुनमचंद मोर, डी.एम.पाटील, सचिन कोठावदे, उमेश राका, रवींद्र देवरे हे कारखानदार पाचोरा तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीच्या संचालपदी बिनविरोध निवडून आलेले असून महिला मतदार संघातून रेखा मथुरवैश्य, लता जैन तर विक्रांत पेंढारकर हे राखीव मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत. इतर मागासवर्गीय मतदारसंघासाठी निवडणूक झाली असता भूषण वाघ हे मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत.

पदाधिकार्‍यांच्या निवडीबद्दल पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, पी.टी.सी. चेअरमन संजय वाघ, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील यासह सहकारी औद्योगिक संस्थेच्या सदस्यांनी तसेच सर्व संचालकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content