पाचोरा येथील बालाजी महाराज रथोत्सव रद्द, मात्र जागेवरच होणार पुजा

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथील श्री. बालाजी महाराज यांची रथाची यात्रा दरवर्षी कार्तिक १४ (चतुर्दशी) रोजी आयोजित करण्यात येत असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १८ नोव्हेंबर २०२१ गुरुवार रोजी येणारी रथाची यात्रा रद्द करण्यात आला आहे. यात मिरवणूक न काढता जागेवर रथाची पुजा करण्यात येणार आहे.

 

श्री. बालाजी महाराज यांची रथाची यात्रा दरवर्षी कार्तिक १४ (चतुर्दशी) रोजी आयोजित करण्यात येत येते. या दिवशी  यात्रेचे नियोजन नसल्याने कोणत्याही प्रकारची दुकाने अथवा फिरत्या विक्रेत्यांनी स्टॉल लावु नये असे आवाहन श्री. बालाजी मंदीर संस्थान पाचोरा यांचेमार्फत करण्यात आले आहे. १८ नोव्हेंबर २०२१ गुरुवार रोजी नेहमी प्रमाणे रथाची सजावट करण्यात येणार असुन श्री. बालाजी महाराज पुजन व रथाची पुजा इ. धार्मिक विधी बालाजी मंदीराचे परिसरात सोशल डिस्टशींगचे पालन करुन करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी शासनाचे निर्देशाचे पालन करावे असे आवाहन विश्वस्त श्री. बालाजी मंदीर संस्थान पाचोरा व सयाजी पाटील परिवार यांचेमार्फत करण्यात येत आहे. बालाजी महाराज पुजा यशवंत राजाराम पाटील व त्यांच्या पत्नी आशा यशवंत पाटील यांचा हस्ते करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Protected Content