सरपंचपदाच्या उमेदवारास मारहाण : महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे निषेध (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । बांभोरी गावाचे सरपंच पदाचे दलित उमेदवार सचिन बिऱ्हाडे यांना मारहाण करत अपहरण करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य भिकन नन्नवरे व त्यांचे इतर साक्षीदार यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी यामागणीसाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर संस्थापक अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले. 

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे धरणगाव तालुक्यातील सरपंच पदाच्या दलित उमेदवार सचिन बिऱ्हाडे यांच्या अपहरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी सचिन बिऱ्हाडे यांना मारहाण करणाऱ्यांवर अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येवून  त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली. याप्रसंगी  मुकुंद अमोल कोल्हे, रमेश सोनवणे, हरिश्चंद्र सोनवणे, सचिन धांडे, चंदन बिऱ्हाडे, प्रा. प्रीतीलाल पवार, नाना मगरे, दिलीप सपकाळे, भारत सोनवणे, आनंदा तायडे, गौतम सपकाळे, जयपाल धुरंदर, यशवंत घोडेस्वार, गौतम सोनवणे, राजू मोरे, उज्वल मोरे, पिंटू सपकाळे, किरण नन्नवरे, धर्मेश पालवे, दिपक पवार, विजय करंदीकर, दिलीप आहिरे, आकाश सपकाळे, दिगंबर सोनवणे, आकाश सपकाळे, सुमित साळुंके आदी उपस्थित होते. 

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या प्रमुख मागण्या  : सरपंच पदाचे उमेदवार सचिन बिऱ्हाडे यांना पोलीस संरक्षण देऊन त्यांना बंदुकीचा परवाना देण्यात यावा. ग्रामपंचायत सदस्य भिकन नन्नवरे व त्यांचे इतर सर्व साथीदारांना तातडीने अटक करून गंभीर गुन्हे दाखल करा. या घटनेत अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या दोघ चारचाकी गाड्या जप्त करण्यात याव्यात. संबधितांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध (अॅट्रोसिटी ) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या.     

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/421037925821699

 

Protected Content