चोपडा येथे रोटरी क्लबतर्फे ११ शिक्षक नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित

WhatsApp Image 2019 09 20 at 7.29.34 PM

चोपडा, प्रतिनिधी | रोटरी इंटरनॅशनलतर्फे भारतातील ३०३०डिस्ट्रीक मधील रोटरी क्लब चोपडाच्या वतीने राष्ट्र घडणीत महत्त्वाचे योगदान  देणाऱ्या शिक्षकांप्रतीचा आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासह चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या भावनेतून शिक्षक दिनानिमित्ताने ११ शिक्षकांना “नेशन बिल्डर अॅवार्ड ” देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे.

याप्रसंगी प्रमुख अतिथी तहसिलदार अनिल गावित यांनी मी पण जि.प., नवोदय तसेच आदिवासी आश्रमशाळेतून शिक्षण घेत घडलोय त्यामुळे आश्रमशाळेतील शिक्षकाचीही नेशन बिल्डर अॅवार्ड देऊन गौरव होतांना पाहून आनंद होतोय असं मत व्यक्त केले. सत्कारार्थी हेमराज पाटील, दीपाली धनगर व एन्. वाय. मलिक यांनी मनोगत व्यक्त केले. नगर वाचन मंदिरात संपन्न झालेल्या ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रोटे. नितीन जैन यांनी , आभार सचिव रोटे. धीरज अग्रवाल यांनी मानले. सूत्रसंचालन राधेश्याम पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रा.विलास पाटील, एम्.डब्ल्यू पाटील, आशीष गुजराथी, प्रफुल्ल गुजराथी, डॉ. वारके, अशोक जैन, पूनम गुजराथी, धीरेंद्र जैन, विलास कोष्टी, महेंद्र बोरसे , सीए पवन गुजराथी, शिरीष पालीवाल, जितेंद्र बोथरा, निखिल सोनवणे व अनेक रोटरी सदस्य व मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

या ११ शिक्षकांचा झाला सत्कार :  प्रा.डॉ.ए.एल. चौधरी (म. गांधी महाविदयालय ), मयूरेश सोनवणे ( बालमोहन विदयालय), विजया पाटील (कस्तुरबा विद्यालय )  ,  रतन मानेसर ( पंकज माध्य.), रत्ना पाटील ( क्लारा इंग्लिश्) , हेमराज पाटील ( विवेकानंद माथ्य. ), दीपाली धनगर ( महिला मंडळ ), एन्. वाय. मलिक ( प्रताप विदया मंदिर ), कला शिक्षक नरेंद्र पाटील ( जय श्री दादाजी हायस्कूल तांदळवाडी ), शरद जगताप ( शा. शि. पाटील माध्य. चहार्डी ), रोटे. भालचंद्र पवार ( सत्रासेन माध्य. आश्रमशाळा ) यांना शॉल, मणिमाळ व गौरवपत्र देऊन सपत्नीक सन्मानीत करण्यात आले.

Protected Content