राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकनाथराव खडसे आणि रोहिणी खडसे

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आगामी निवडणूकीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ४० नेत्याचा समावेश करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांचा सुध्दा या यादीत समावेश करण्यात आला आहे. यांच्याव्यतिरिक्त या यादीत पक्षप्रमुख शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, पी.सी. चाको, सोनिया दुआन, आमदार राजेश टोपे, आमदार रोहित पवार प्राजक्त तनपुरे, सक्षणा सलगर, रोहित आर. पाटील, महबूब शेख, जावेद हबीब, पूजा मोरे इत्यादी बडया नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट झाल्यानंतर अनेक मोठे नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे शरद पवारांनी आपल्या नवीन नेत्यांचा या यादीत समावेश केला आहे.

Protected Content