जुने बसस्थानक ते विद्यापीठ सीटी बससेवा सुरू करा ; दीपककुमार गुप्ता यांची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुने बसस्थानक ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठापर्यंत सीटी बससेवा सुरू करावी, असे मागणीचे निवेदन बुधवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार कुमार गुप्ता यांनी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुने बसस्थानक ते विद्यापीठ या मार्गावरील सिटी बसेस अद्याप बंदच आहे. विद्‌यापीठात जाणाऱ्या व तेथून शहरात येणाऱ्या सिटी बसेस बंद असल्यामुळे बरेच पल्यांसह सर्वच विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्यासाठी ये-जा करण्याची गैरसोय सुरू आहे. कोरोनाची लाट ओसरली असून सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. तरी देखील विद्यापीठासाठी जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या बसेस सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने रिक्षाने ये-जा करावी लागत आहे. त्यासाठी किमान दररोज ८० ते १०० रूपये खर्च करावे लागत आहे. हा खर्च गोरगरीब जनतेला परवडणारा नाही. हा जीवघेणा प्रकार लवकर थांबवणे गरजेचे आहे. तरी जळगाव शहरातील जुने बसस्थानक ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपर्यंत सिटी बसेस सुरू करावे, असे मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना निवेदनातून केली आहे.

Protected Content