मेहरूण येथे महिलांनी व्यक्त केली यमुना नदीप्रती कृतज्ञता

यमुना माता.jpg 1

जळगाव, प्रतिनिधी | देशातील अनेक महत्वाच्या नद्यांमध्ये यमुना नदीचे स्थान महत्वाचे असून यमुना मातेप्रती भक्तीभाव म्हणून शहरात मेहरूण तलावात चुनरी टाकून महिला भाविकांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.

माहेश्वरी गणगौर महिला मंडळातर्फे “चुनरी मनोरथ” या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी दुपारी करण्यात आले होते. जिल्ह्यात हा कार्यक्रम पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला यमुना नदीचे पाणी मेहरूण तलावात टाकून यमुना मातेची आरती करण्यात आली. यावेळी एका फुलांनी सजविलेल्या मनमोहक नावेमध्ये यमुना मातेचे फोटो ठेवून पदाधिका-यांनी पूजन केले. यावेळी तलावावर यमुना मातेची चुनरी ठेवण्यात आली. मेहरूण तलावाचा परिसर यावेळी फुलांनी सजविण्यात आला होता. महिलांनी परिसरात कलश शोभायात्रा काढीत यमुना नदीविषयी भक्तीभाव दाखविला. तसेच विविध फळांचे ५६ भोग दाखविण्यात आले. यावेळी महिला भाविकांनी रासलीला खेळत वातावरणात उत्साह निर्माण केला. पारंपारिक वेशभूषेत महिला सहभागी झाल्या होत्या. महिला भाविकानी ‘मिठी रससे भरोडी राधा राणी लागे’ अशी विविध प्रकारची पारंपारिक नृत्य सादर करीत वातावरण भक्तीमय केले. कार्यक्रमात ४०० पेक्षा अधिक महिला भाविकांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी मंडळाच्या अध्यक्ष अर्चना मंडोरा, सचिव तृप्ती लढढा, किरण राठी, प्रभा लाहोटी, साधना कोगटा, अनिता मंडोरा, उज्ज्वला बाहेती, कविता मालीवाल, सुनिता दमाणी, अनिता मंत्री, वर्षाली मंडोरा, अलका लढढा, रुची मणियार, मनीषा मंत्री, हेमा बियाणी, नीतू मुंदडा, नीतू बिर्ला, शीतल मंडोरा, स्वाती काबरा, रिंकू मालीवाल, सरिता झंवर, अंकिता तोतला, अर्चना राठी, रचना मंत्री, मोना भुतडा, स्मिता कोठारी, सुरभी झंवर, दीप्ती मंत्री, भाग्यश्री काबरा, संगीता सोमाणी आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content