…हा तर अपक्ष आमदार, राष्ट्रवादीच्या पाठींब्यामुळे निवडून आला- एकनाथराव खडसे (व्हिडीओ)

मुक्ताईनगर प्रतिनिधी । हा कुठला शिवसेनेचे आमदार हा तर अपक्ष आमदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे निवडणू आलेला आमदार आहे. रोहिणी खडसेंवरील झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी केल्यास अनेक महिलांच्या अत्याचाराची प्रकरणे समोर येतील अश्या शब्दात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला.

 

सोमवारी २७ डिसेंबर रोजी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याकारवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध करत आमदार चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला.

 

यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले की, चंद्रकांत पाटील हा शिवसेनेचा आमदार नाही. हा अपक्ष आमदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांच्यामुळे निवडून आलेला आमदार आहे. एकीकडे शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणवतो आणि दुसरीकडे अपक्ष आमदार असल्याचे सांगता. युतीची गद्दारी करून निवडून आलेला हा आमदार आहे. यापुर्वीची पार्श्वभूमीची चौकशी करावी, एका महिलेवर आणि मुलीवर अत्याचार केला असल्याची माहिती सांगत.  या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे बाहेर येतील. यातील ऑडिओ क्लीप्समध्ये महिलांबाबतचे अनेक अश्‍लील संदर्भ आहेत.

 

माजी मंत्री खडसे पुढे म्हणाले की, गुंड प्रवृत्तीचे लोक असल्याने यापुर्वी मी देखील अनेक भाषणांमध्ये गुंडप्रवृत्तीच्या लोकांवर आळा घालण्याबाबत सांगितले होते. गुंडागर्दी वाढेल, अवैध धंदे वाढतील, महिलाचे छेडछानीचे प्रकार वाढतील असे प्रत्येक भाषणात सांगत होते. आता नेमकं तेच घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

Protected Content