अभिवाचन स्पर्धेत संजय निकुंभ यांचे यश

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सांस्कृतिक क्षेत्रातील मानाच्या ‘रंगगंध कलान्यास ‘ आयोजित, पुज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती जागतीक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या अंतिम फेरीत येथील मुक्त पत्रकार व वरिष्ठ रंगकर्मी संजय निकुंभ यांनी स्व-लिखीत,दिग्दर्शित ‘ “शिवशाहीच्या अज्ञात बेटावर” या साहित्यकृतीचे सहकर्मी सुहास दुसाने यांचे सह बहारदार प्रभावी अभिवाचन करीत ‘ सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय ‘ वैयक्तिक उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक प्राप्त केले.

महोत्सवाच्या समारोपपास झालेल्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रख्यात सिनेअभिनेत्री सुप्रिया मतकरी उर्फ सुप्रिया विनोद, रविंद्र लाखे(मुंबई) , अनिल चनाखेकर(नागपुर), विजयकुमार करभजन(परभणी), पौर्णिमा हुंडीवाले(भोपाळ), मुकुंद करंबळेकर व मिनाक्षी निकम यांच्या हस्ते निकुंभ यांना सन्मानचषक, प्रमाणपत्र व धनादेशाने गौरविण्यात आले.

या जागतिक अभिवाचन स्पर्धेत परदेशस्थ संघासह, विवीध राज्यातील बृहन्महाराष्ट्र संस्था तसेच महाराष्ट्रातील विवीध २१ केंद्रातून अंतिम फेरीत धडक मारलेल्या सुमारे १०३ कलावंतांचा सहभाग होता.यात निकुंभ यांनी परिश्रमपूर्वक सर्वोत्कृष्ट पहिल्या पाचात ‘बेस्ट ऑफ फाईव’ मध्ये स्थान मिळवले. त्यांच्या या सांस्कृतिक यशाबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होतेय.

Protected Content