दुचाकीवरील दोघांनी महिलेचे मंगळसुत्र धुमस्टाईल लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आनंद नगरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ अज्ञात दोन जणांनी दुचाकीवर येवून पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातून ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र जबरीने ओढून चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कविता विजय जयस्वाल वय ५० रा. नेहरू नगर, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी सायंकाळी त्या आनंद नगरातील स्वामी समर्थ केंद्राजवळून पायी जात असतांना मागून दुचाकीने आलेल्या अज्ञात दोन जणांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र जबरी ओढून चोरून नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर महिलेने आरडाओरड केली परंतू तोपर्यंत दोन्ही चोरटे घटनास्थळाहून पसार झाले. त्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Protected Content