मुख्यमंत्र्यांचा अर्ज वैध ; कॉंग्रेसचा आक्षेप फेटाळला

CM 2

 

नागूपर (वृत्तसंस्था) मुख्यमंत्र्यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर नोटरीची मुदत संपल्याचा शिक्का मारला असल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करावा,असा आक्षेप कॉंग्रेसने घेतला होता. परंतू निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस याचा अर्ज वैध ठरवला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर नोटरीची मुदत संपल्याचा शिक्का मारला असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज सील केला आणि या प्रकरणी सुनावणी घेतली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी सुनावणी घेतल्यानंतर आपला निर्णय जाहीर केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचा आक्षेप फेटाळत मुख्यमंत्र्यांचा अर्ज वैध ठरवला आहे. नोटरीचा कालावधी वाढवल्याचा प्रशासनाचा निर्वाळा दिला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज वैध ठरवल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने नोटरीच्या मुदतीसंदर्भात आक्षेप घेतला होता आणि हा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळत मुख्यमंत्र्यांचा अर्ज वैध ठरवला आहे.

Protected Content