नाचनखेडा येथे जन आशीर्वाद यात्रेस प्रतिसाद

news

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नाचनखेडा येथे जन-आशीर्वाद यात्रेनिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

या कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
गावासाठी राष्ट्रीय पेयजल अंतर्गत पाणीपुरवठा योजना, रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, अनुसूचित जाती- जमाती वस्थितील रस्ते काँक्रेट करणे, खुले सभागृह बांधणे, व्यायाम शाळा, सिमेंट नाला बांध दुरुस्ती, नाला खोलीकरण, साठवण बंधारा दुरुस्ती, केटी वेअर दुरुस्थी अश्या विवीध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ सल्लागार अॅड. दिनकर देवरे, जि.प. सदस्य रावसाहेब पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख अविनाश कुडे, माजी सरपंच अरुण काटकर, सागर पाटील, सोनू परदेशी, गणेश देशमुख, नाचनखेडा सरपंच रमेश कोळी, उपसरपंच धर्मेंद्र पाटील, करण नाना राजपूत, संतोष सोनवणे, रमेश रतन पाटील, कोमलसिंग पाटील, शाखा प्रमुख प्रकाश पाटील, स्वप्नील पाटील, संदीप पाटील, राजेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, पप्पू चौधरी व गाव व गटातील शिवसेना युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content