घरकुल घोटाळा प्रकरणात शिक्षा : नरेंद्र अण्णा पाटील समर्थकांद्वारे आनंद साजरा (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 01 at 7.47.28 PM

जळगाव प्रतिनिधी | काल घरकुल घोटाळ्यातील सर्व आरोपींना शिक्षा झाल्याने आज स्वर्गीय नरेंद्र अण्णा पाटील यांच्या समर्थकांनी फटाके फोडून व पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.

स्वर्गीय नरेंद्र अण्णा पाटील यांच्या समर्थकांनी काव्यरत्नावली चौकात एकत्र येऊन घरकुल घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. याचा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी नरेंद्र अण्णा अमर रहे च्या घोषणा दिल्यात. स्वर्गीय नरेंद्र अण्णा पाटील यांच्या २३ वर्षाच्या संघर्षाला यश आल्याच्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्यात. स्वर्गीय नरेंद्र अण्णा पाटील यांच्या पाठपुराव्याचे हे फलित असून जळगावकर म्हणून आता महापालिका विकास कामे करू शकेल अशी मत व्यक्त केले. यावेळी काव्यरत्नावली चौकात फटाके फोडण्यात आले. तसेच पेढ्याचे वाटप करण्यात आले.

Protected Content