चाळीसगावात हरतालिका पूजनासाठी महिलांचा प्रचंड उत्साह

chalisgaon news

चाळीसगाव प्रतिनिधी । हरतालिका हा महिलांसाठी अत्यंत पवित्र व महत्त्वाचा सण मानला जातो.चाळीसगाव येथे प्रतिभाताई मंगेश चव्हाण आयोजित हरतालिका पूजन सोहळ्याला सिताराम पहेलवान मळा येथे महिलांनी प्रचंड उत्साहात सहभाग घेतला.

शिव शंकर व पार्वती मातेच्या नात्याचा, समर्पणाचा व प्रेमाचा हा सण असतो. शिव शंकर व पार्वती या भारतातील सर्वोत्तम दैवतांना नमन करण्यासाठी प्रतिभाताई मंगेश चव्हाण आयोजित सामूहिक हरतालिका पूजनासाठी तालुक्यातील 2 हजार महिलांनी सहभाग घेतला. या सामूहिक हरतालिका पूजन सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येक महिलेची सौ. प्रतिभाताईंनी ओटी भरली व प्रत्येक महिलेला राजगिऱ्याच्या लाडूचे पाकिट व केळी देण्यात आली. ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारामध्ये शिवशंकरांची व पार्वती मातेची पूजा करण्यात आली. या हरतालिका पूजनाच्या वेळी महिला भजनी मंडळांनी सुंदर भजने व भावगीते सादर केली. या हरतालिका पूजन सोहळ्याला युवा नेते मंगेश चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. हरतालिका पूजन करून महिलांनी शिवशंकर व पार्वती मातेचे आशीर्वाद घेतले. यावेळी प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्याच्या दुष्काळमुक्तीचे साकडे घातले.

Protected Content