मुख्यमंत्र्यांकडे पक्षात आलेल्यांना क्लीन चिट देण्याची वॉशिंग पावडर ; एकनाथ खडसेंचा टोला

Eknath Khadse Devendra Fadn

 

जळगाव (प्रतिनिधी) भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. आम्ही त्यांना स्वच्छ करुन घेतो. पक्षात आलेल्यांना क्लीन चिट दिली जाते, त्यानंतर ते आपल्या कामाला लागतात,अशा शब्दात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला आहे. ते आज एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते.

 

एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलतांना खडसे म्हणाले की, विरोधी पक्षातून भाजपात येणाऱ्या नेत्यांविषयी बोलताना खडसे म्हणाले की आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, असे मुख्यमंत्री सांगतात. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडरही आहे. आम्ही त्यांना स्वच्छ करून पक्षात घेतो. पक्षात घेतल्यानंतर त्यांना क्लीन चिट दिली जाते आणि त्यानंतर ते पुन्हा आपल्या कामाला लागतात. कारण आमचा पक्ष ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे, असा मुख्यमंत्र्यांना विश्वास आहे. भाजपमध्ये येणारे साधुसंत नाहीत. सत्तेची ऊब मिळावी यासाठी हे सगळे येत आहेत. भाजपची नीती मूल्य मान्य म्हणून सर्व येत आहेत अअसे नाही. पक्ष वाढवण्यासाठी चांगल्या लोकांना पक्षात घ्यावे लागते. मात्र चांगल्या लोकांची व्याख्या ठरवत असताना, दुमत होऊ शकते, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. जळगाव येथील घरकुल घोटाळ्याचा निकाल, भाजपामध्ये सुरू असलेले इनकमिंग आणि नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश इत्यादी विषयांवर खडसे यांनी यावेळी रोखठोक मते मांडली.

Protected Content