अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे २० पेक्षा जास्त आमदार ?

Ajit Pawar

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासोबत पक्षातील २० पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती समोर आली असून यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याची माहिती समोर आली आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा आज सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित नव्हते. तथापि, त्यांचे काही समर्थक आमदार याप्रसंगी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर शरद पवार यांनी आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितल्याने अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडल्याचे स्पष्ट झाले. स्वत: अजित पवार यांनी या प्रकरणी कोणतेही भाष्य केलेले नाही. तथापि, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील २० पेक्षा जास्त आमदार असून यात धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत मात्र अद्यापही अधिकृत घोषणा केलेली नाही. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी असून सर्व आमदारांच्या पाठींब्यांचे पत्रदेखील त्यांच्याच कडे आहेत. यामुळे आता या पत्राला त्यांनी भाजपकडे दिल्याची शक्यतादेखील आहे. असे असल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कोणतीही कार्यवाही होणार नसल्याने ही अतिशय धुर्त खेळी असल्याचे दिसून येत आहे.

Protected Content