योगेश्वर नगरातून एकाची दुचाकी लांबविली !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील योगेश्वर नगरातील श्रीकृपा गजानन पार्क येथील घरासमोरुन चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी चोरुन नेली. ही घटना १५ मार्च रोजी उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील योगेश्वर नगरातील श्रीकृपा गजानन पार्क मध्ये अतुल लिलाधर तळेले (वय-४२) हे वास्तव्यास असून ते खासगी नोकरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ एडबल्यू ६३७४) क्रमांकाची दुचाकी आहे. शुक्रवारी १५ मार्च रोजी रात्री त्यांनी घरासमोर दुचाकी लावलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरुन त्यांची दुचाकी चोरुन नेली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास त्यांना दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी संपुर्ण परिसरात दुचाकी शोध घेतला. मात्र तरी देखील त्यांना दुचाकी मिळून न आल्याने अखेर त्यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय खैरे हे करीत आहे.

Protected Content