मेहरूण परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । मेहरूण परिसरातील संतोषी माता नगरातून व्यापाऱ्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, याकुब खान शेरखान मुल्ताणी (वय-४६) रा. संतोषी माता नगर, मेहरूण हे व्यापार करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. २६ मे रोजी ते सांयकाळी (एमएच १९ सीए ७७३१) क्रमांकाच्या दुचाकीने घरी आले. दुचाकी घरासमोर पार्क करून लावली होती. २६ मे रोजी रात्री ९ ते २७ मे रोजी रात्री १ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने १७ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. शोधाशोध करून दुचाकी मिळून न आल्याने याकुब खान यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मिलींद सोनवणे करीत आहे. 

Protected Content