केबल वायरची चोरी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । खोटेनगरात ऑप्टीकल फायबर केबल वायर चोरून नेल्याप्रकरणी दोन जणांवर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, घनश्याम दत्तात्रय फालक (वय-४५) रा. नागेश्वर कॉलनी हे केबलचालक आहे. खोटेनगर ते साईनगर दरम्यान त्यांच्या मालकीची ऑप्टीकल फायबर केबल वायर दोन चोरट्यांनी चोरून नेल्याचे २५ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. ही चोरी संजय मोतीलाल कुमावत रा. हरीविठ्ठल नगर आणि दिपक बन्सीलाल माळी रा. जळगाव यांनी केली असल्याने घनश्याम फालक यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

Protected Content