वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडाल्याने मार लागून वृद्धाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बोरनार येथे वादळी वाऱ्यामुळे उडालेले पत्रा वृध्दाच्या पोटात घुसल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रभाकर जामा चौधरी (वय-६६) रा. बोरनार ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील बोरनार येथे प्रभाकर चौधरी हे पत्नी रत्नाबाई यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अवकाळी वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. त्यावेळी प्रभाकर चौधरी हे त्यांच्या घराच्या ओट्यावर बसलेले होते. अचानक समोरील घरावरचा पत्रा उडाल्याने थेट प्रभाकर चौधरी यांच्या पोटात घुसला त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असतांना वैद्यकीय अधिकारी डॉ रेणूका भंगाळे यांनी मयत घोषीत केले. या दुदैवी घटनेमुळे बोरनार गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत वृध्दाच्या पश्चात पत्नी, रत्ना, संजय, समधान आणि जितेंद्र ही तीन मुले, विवाहित मुलगी विद्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Protected Content