अवयवदान मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांची भूमिका महत्वाची — डॉ नरेंद्र ठाकूर

 

 

एरंडोल : प्रतिनिधी  । अवयवदान मोहिमेत समाजातील ज्येष्ठ नागरिकांची भूमिका  महत्वाची आहे असे प्रतिपादन  डॉ नरेंद्र ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित व्याख्यानात केले .

 

येथे सूर्योदय  ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संघ आयोजित ” अवयवदान सर्वश्रेष्ठ दान ” या विषयावरील व्याख्यानात   सुखकर्ता फाउंडेशनचे डॉ . नरेंद्र ठाकूर यांनी  मुक्त संवाद  साधला. ते पुढे म्हणाले की , आज भारतात ५ लक्ष गरजू रुग्णांना अवयवांची गरज असून दर दहा मिनिटाला एकाची प्रतीक्षा यादी मध्ये नोंद होत असल्यामुळे मेंदू मृत होणाऱ्या रुग्णाच्या अवयवदानाची टक्केवारी वाढविण्याची आज गरज आहे . आज भारतात प्रत्येकी सात नागरिकानंतर एक नागरिक हा ज्येष्ठ नागरिकाच्या संज्ञेत येत असल्यामुळे व सामाजिक बांधिलकीच्या स्वरूपात हे संघटन संपूर्ण देशात उकृष्ट कार्य करत असल्यामुळे ग्रामीण  समाजजीवनात अवयवदानाबद्दल जे गैरसमज , धार्मिक अंधश्रद्धा , भीती , अप्रप्रचार आणि अज्ञान आहे ते दूर करण्यासाठी अवयवदूत म्हणून व कुटुंबातील सदस्यांपैकी कोणी मेंदू मृत अवस्थेत अवयवदान करणेसाठी   पात्र असेल त्यावेळेस  संमती देऊन अवयव प्रत्यारोपणाच्या माध्यमातुन ८ गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी  ज्येष्ठ नागरिक हे प्रभावीपणे हातभार लावू शकतात अवयवदान मोहिमेसाठी त्यांची भूमिका महत्वाची आहे

 

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक  संघातर्फे प्रारंभ करण्यात आलेल्या वाचनालयाचे उदघाटन डॉ . नरेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले .सौ. सरला विंचूरकर या यकृतदात्या महिलेनेही स्वानुभव विषद करून जिवंतपणी अवयवदान केल्यानंतर तब्येतीवर कुठलाही प्रतिकूल परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केले. सौ.सरला विंचुरकर या यकृतदात्या महिलेचा व वाचनालयासाठी देणगी देणाऱ्याचा सत्कार संघाचे अध्यक्ष अरुण माळी , चिटणीस विनायक कुलकर्णी , उपाध्यक्ष जाधवराव जगताप यांनी केला .

 

कवी निंबा बडगुजर , सुपडू भांडारकर , पी . जी . चोधरी , गणेश पाटील , नामदेव पाटील , विश्वनाथ पाटील , भगवान महाजन , जगन महाजन , प्रा . शिवाजीराव अहिरराव , जगदीश ठाकूर , कुंदन ठाकूर , आरती ठाकूर , नीलिमा मानुधने ,डॉ   प्रशांत पाटील ,  पदमाकर विंचूरकर ,राहुल शिंदे , शेखर बुंदेले , पवन गवळी आदींची  उपस्थिती याप्रसंगी होती .

प्रास्ताविकात संघाचे अध्यक्ष अरुण माळी यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली  सूत्रसंचालन विनायक कुलकर्णी यांनी केले तर आभार  निंबा बडगुजर यांनी मानले .

 

Protected Content