जळगावच्या न्यायालयात लोक आदलतीचे आयोजन (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी ।  जळगाव जिल्हयातील सर्व न्यायालयांमध्ये आज तडजोड पात्र प्रलंबित खटले मिटविण्यास संधी न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्हा विधी  सेवा प्राधिकरणतर्फे   लोक आदलतीचे आयोजन करण्यात आले.   जिल्हा न्यायालयात लोक आदलतीचे उद्घाटन करण्यात आले.   

 

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी  सेवा प्राधिकरण अध्यक्ष जगमलाणी, जिल्हा विधी सेवा  प्राधिकरण सचिव ए. ए. के. शेख, जिल्हा वकील संघ दिलीप बोरसे,जिल्हा वकील संघ उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, दर्शन देशमुख, सरकारी अभियोक्ता केतन ढाके आदींची उपस्थिती लोक न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. आज जवळपास ६०००  प्रलंबित प्रकरणे व  पूर्वनिर्णय बाकी असलेल्या  १६०००  प्रकरणाबाबत कामकाज करण्यात येणार आहे. लोक न्यायालयात मोटर वाहन ट्राफीक चालान, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले,   आदीचे व खटला दाखलपूर्व प्रकरणे समावेश आहे.  ज्या खटल्यामध्ये साक्षी, पुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जात आहेत.  राष्ट्रीय लोकन्यायालयात संपूर्ण जिल्ह्यात आपसात तडजोडीसाठी मोठ्या प्रमाणावर खटले  ठेवण्यात आले आहेत.

 

Protected Content