घरकुलाचा निधी मंजूरीसाठी एक दिवसीय उपोषण ( व्हिडीओ )

 

WhatsApp Image 2019 02 28 at 12.31.04 PM

एरंडोल (प्रतिनिधी)। तालुक्यातील कासोदा येथील घरकुल लाभार्थ्यांना घरकुलसाठी निधी मिळावा यासाठी पंचायत समितीसमोर लाभार्थ्यांनी एक दिवशीय उपोषणास बसले आहे. तसेच मागण्याचे निवेदन गटविकास अधिकारी यांना दिले. तत्काळ घरकुलाचे मंजूरी देवून देण्यात यावी अन्यथा होणार्‍या घटनेला एरंडोल प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील कासोदा येथील चार जणांना घरकुल मंजूर झाले. घरकुल मंजूर होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला मात्र अद्यापपर्यंत कोणतीही रक्कम खात्यात आलेली नाही. त्यामुळे घरकुल मंजूर होवूनही घरांसाठी पहिला हप्ताही अद्यपर्यंत मिळाला नाही. तक्रारदार शेख सईद शेख यासीन, शेख सांडून शेख समद, शेख मुनाफ शेख इब्राहिम आणि रमजान शेख कादर यांनी यापुर्वी 7 जानेवारी 2019 रोजी झालेल्या लोकशाही दिनी तक्रारही दिली नाही. तक्रार देवूनही अद्यापपर्यंत कारवाई न करता दुर्लक्ष केले जात आहे. घरकुल बांधण्यासाठी निधी मिळत नसल्याने न्याय देवून निधी मिळावा यासाठी एरंडोल पंचायत समितीसमोर चारही लाभार्थींनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. तात्काळ एक दिवसीय उपोषणास बसले आहे.

पहा– उपोषणार्थी काय म्हणतात ते !

Add Comment

Protected Content