गिरीश महाजन यांच्या विधानांचा पालकमंत्र्यांनी घेतला समाचार

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांना संपवण्याचं कट कारस्थान राज्य सरकार करत असून ‘फोडाफोडीचे राजकारण न करता पालकमंत्र्यांनी विकासावर लक्ष द्यावं’ असं विधान गिरीश महाजन यांनी केलं होतं त्याचा आज पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला.

“शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करण्यात येत आहे. असं म्हणत शेतकऱ्यांना संपवण्याचं कट कारस्थान राज्य सरकार करत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला केला होता. त्याला प्रत्युत्तर देतांना पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांच्या बाबतीत जर कोणी अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल तर ती बाब निश्चितच चुकीची आहे. आजच्या या आजच्या काळामध्ये हे कारण मला योग्य वाटत नाही असे म्हणत मागच्या आणि आताच्या काळामध्ये कर्जमाफीचा जर आपण अंदाज घेतला तर वन स्ट्रोक कर्जमाफी कोरोना असल्यावरही या सरकारने देण्याचा प्रयत्न केला. येत्या मार्चच्या अधिवेशनामध्ये ज्या शेतकऱ्यांनी दोन लाखाच्या वर कर्ज काढले त्यांचीही आर्थिक तरतुद हे शासन करणार आहेत. आणि प्रोत्साहनपर ५० हजार रुपये देण्याचे बाकी आहेत. याची तरतूद करण्याचा शासनाचा विचार आहे. मला तरी असं वाटतं की हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे. असं सांगतांनाच शेतकऱ्यांच्या आठ आठ पोरांना चिरडणारं सरकार नाहीये तर शेतकऱ्यांना वाचवणारं हे सरकार आहे. मला वाटतं गिरीश भाऊंना यूपीची घटना माहिती नसेल तर त्यांनी ती आठवून घ्यावी असा टोला मारत त्यांनी मारला.

नगरसेवकांच्या शिवसेनेत प्रवेशावर गिरीश महाजन यांनी ‘फोडाफोडीचे राजकारण न करता पालकमंत्र्यांनी विकासावर लक्ष द्यावं’ या विधानाचा समाचार घेतांना ते म्हणाले की, “गिरीशभाऊंनी मागच्या काळात जे केलं तेच मी करतोय कारण ते माझे मोठे भाऊ आहे. त्यांनी जी मागच्या काळात फोडाफोडी केली त्याच्यामध्ये आता निवडून आले ते ५७ नगरसेवक आहेत त्यातील अर्ध आमचे होते जे त्यांच्यात गेले. तेच आमच्यात आले असं म्हणत गिरीशभाऊंनी कोणाचे फोडू नये. आम्हीही फोडणार नाही.” असं म्हणत पलटवार केला आहे.

Protected Content