पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर हल्ला

चंदीगड । पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून काँग्रेस व अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर गोळीबार करण्यात आल्याचे समोर आल्याने खळबळ उडाल आहे.

जलालाबादमध्ये मंगळवारी स्थानिक निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या दोन पक्षांमध्ये जोरदार राडा झाला. अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांच्या कारवर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात तीन कार्यकर्त्यांना गोळी लागल्याची माहिती मिळत आहे.

अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी हा जीवघेणा हल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर अकाली दल आणि काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले. याच दरम्यान एकमेकांवर दगडफेकही केली. तसेच गोळीबार देखील करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केंद्रावर जात असताना ही घटना घडली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. एकमेकांवर लाठ्याकाठ्या आणि गोळीबारही करण्यात आला. तसेच दगडफेकही करण्यात आली. फिरोजपूरच्या गुरुहरसहायमध्ये या आधी दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली होती.

अकाली दलाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या तीन कार्यकर्त्यांना गोळ्या लागल्या असल्याची माहिती दिली आहे. तसेच पोलिसांना काँग्रेसच्या हल्लेखोर कार्यकर्त्यांविरोधात कारवाई न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत असा आरोपही अकाली दलाने केला आहे.

Protected Content