माजी पंतप्रधान राजीव गांधीचे मारेकरी भारतातूनही मुक्त; श्रीलंकेकडे रवाना

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या तीन दोषींची काही महिन्यांपूर्वी तुरुंगातून माफीच्या तत्वावर सुटका झाली होती. मुगुरन, रॉबर्ट अन् जयकुमार अशी तीन दोषी आरोपींची नावे आहेत. या तिघांची शिक्षा पूर्ण झालेली नाही किंवा त्यांची निर्दोष सुटकाही झालेली नाही. पण सुप्रीम कोर्टाने संविधानातील कलम 142 चा वापर करून विशेष अधिकारांतर्गत त्यांची सन २०२२ मध्ये सुटका केली होती. पण त्यानंतर त्यांना त्रिची निर्वासित छावणीमध्ये ठेवण्यात आले होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि केंद्रीय गृहखात्याने क्लिअरन्स दिल्यानंतर या छावणीतून २ एप्रिल २०२४ रोजी या चौघांची सुटका करण्यात आली. त्यानंतर आज या तिघांना त्यांचा मूळ देश असलेल्या श्रीलंकेला परत पाठवून देण्यात आले. तामिळनाडू राज्यातील चेन्नई विमानतळावरुन सकाळी त्यांची रवानगी झाली. या चौघांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात चेन्नई विमानतळावर नेण्यात आले होते.

२१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांची तामिळनाडूतील एका रॅलीदरम्यान आत्मघाती बॉम्बनं उडवून देऊन हत्या करण्यात आली होती. राजीव गांधींच्या गळ्यात एका महिलेनं फुलांचा हार टाकला या हारमध्ये बॉम्ब बसवण्यात आला होता. या हत्येप्रकरणी मुरुगन, संथन, पेरारीवलन, नलिनी, रॉबर्ट पायस, जयाकुमार आणि रविचंद्रन हे सात जण कोर्टात दोषी ठरले होते. स्थानिक कोर्टानं याप्रकरणी एकूण २६ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. पण मे १९९९ मध्ये सुप्रीम कोर्टाने १९ लोकांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. इतर सातपैकी नलिनी मुरुगन, श्रीहरन, संथन आणि पेरारिवलन हे चौघे दोषी ठरले होते त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली तर रविचंद्रन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या चौघांनी दयेचा अर्ज दाखल केला होता. त्यावर तामिळनाडूच्या राज्यपालांनी ही शिक्षा जन्मपठेपेत रुपांतरित केली होती. तसेच इतरांची याचिका 2011 मध्ये राष्ट्रपतींनी फेटाळली होती. सर्व दोषी मुदतपूर्व सुटका व्हावी म्हणून बराच काळ कायदेशीर लढाई लढत होते.

तामिळनाडू सरकारनेही त्यांची मुदतपूर्व सुटकेसाठी राज्यपालांकडे शिफारस केली होती. राज्यपालांनी ही विनंती मान्य करुन पुढील मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवली होती. दरम्यान, पेरारिवलन याला टाडा कोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, नंतर सुप्रीम कोर्टानं दयेचा अर्ज निकाली काढण्यास विलंब झाल्याचं सांगत फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. त्यानंतर राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी दोषी आढळलेले नलिनी श्रीहरन आणि पी रविचंद्रन यांची जेलमधून मुक्तता करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. न्या. बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं त्यांची वागणूक समाधानकारक असल्यानं त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच सुटका करण्याची परवानगी दिली होती.

Protected Content