विष मुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज व्हावे -डॉ. गील

WhatsApp Image 2020 01 10 at 7.40.34 PM

पहूर, ता. जामनेर, वार्ताहर |  बदलत्या जीवनशैलीमुळे अन्नपदार्थांद्वारे आपल्या शरीरात विषयुक्त अन्न जात असून विषमुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी बांधवांनी नैसर्गिक शेतीची कास धरावी , असे आवाहन हरबेज वर्ल्डचे सीएमडी तथा शास्त्रज्ञ डॉ. जी. एस. गील यांनी केले. पहूर पेठ गृप ग्रामपंचायतीच्या टेरेसवर आयोजित विषमुक्त शेती कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

विषमुक्त शेती कार्यक्रमाप्रसंगी डॉ .गील म्हणाले की, आपल्या पुर्वजांनी केलेल्या नैसर्गिक शेतीचा आपण अवलंब करावा. रासायनिक खतांच्या अतीवापरामुळे शेती नापीक होत आहे. शास्त्रोक्त पध्दतीने शेती केल्यास शेती आणि शेतकऱ्यांची प्रगती होईल. यावेळी अकोला येथील सर्ग विकास संस्थेचे संचालक सेंद्रीय शेती तज्ज्ञ शरद इंगळे, आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक संजय पवार, हरबेज वर्ल्डच्या राज्यप्रमुख माधुरी गुजराती, चेतन रोकडे आदींनी मनोगत व्यक्त केले. व्यासपिठावर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख, तालुका कृषी अधिकारी डॉ. अभिमन्यू चोपडे, नायब तहसिलदार सुभाष कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, सरपंच निता पाटील, उपसरपंच श्याम सावळे, डॉ. सुरेश जैन आदी उपस्थित होते. यावेळी सरपंच निता पाटील यांचा सरपंच ‘ऑफ द इयर ‘ पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मेणगांव येथील सरपंच सुरेश पाटील यांचाही सेंद्रिय शेतीतील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आयोजक संतोष चिंचोले यांनी केले .सुत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले. आभार राजधर पांढरे यांनी मानले. याप्रसंगी माजी सरपंच प्रदिप लोढा, माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, अॅड. संजय पाटील, भिका पाटील, जगन धनगर, प्रा .पी. पी. लहासे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ, मुख्याध्यापक , शिक्षक , विदयार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Protected Content