जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करा : भाजप महिला आघाडीचे निवेदन

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चित्रा वाघ यांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन भाजप महिला आघाडीतर्फे देण्यात आले आहे.

भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांची मानहानी व बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वर कडक कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात यावा यासाठी येथील भाजप महिला आघाडीने पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन, जिल्हा अध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी महीला आघाडी च्या वतिने सावदा पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी महीला आघाडी अध्यक्षा रेखाताई बोंडे, जळगाव जिल्हा संयोजक बेटी बचाओ बेटी पढाओ च्या सारीका चव्हाण, डॉ प्रियदर्शनी सरोदे, आशाताई मोरे, नेहा गाजरे,अलका बोरोले, देवयानी बोंडे व संयुक्ता चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Protected Content