कृषी केंद्रांची पथकाकडून झाडाझडती

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुका कृषी विभागाच्या भरारी पथकाने तालुक्यातील विविध ठिकाणी कृषी निविष्ठा केंद्रांची संपुर्ण तपासणी करण्यात आली.

सध्या खरीप हंगामाची घाई सुरू असतांना कृषी खात्यातर्फे पथकाच्या माध्यमातून विविध कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली. या वेळी पथकाने कुठल्याही परिस्थितीत लिंकिंग,जादा दराने विक्री, काळा बाजार होणार नाही याबाबत सक्त सूचना देऊन अनियमितता आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशारा तालुक्यातील कृषी केन्द्र धारकांना अधिकार्‍यांकडून देण्यात आला आहे.

कृषी केंद्र तपासणी प्रसंगी भरारी पथकाचे तालुका कृषी अधिकारी अजय खैरनार,कृषी अधिकारी प्रकाश कोळी, पंचायत समिती कृषी अधिकारी धीरज हिवराळे ,कृषी पर्यवेक्षक श्रीमती कंकाळ आदी उपस्थित होते.

याप्रसंगी, खरीप हंगामात सर्व निविष्ठा शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीत विक्री व्हाव्यात, यादृष्टीने विक्रेत्यांकडील साठा रजिस्टरची तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील मोठ्या गावातील अधिकृत विक्रेत्यांच्या कृषी केंद्रांवर तपासणी करण्यात आली.शेतकर्‍यांनी निविष्ठा घेताना पक्के बिल घेणे,जादा दराने विक्री सुरू असल्यास कृषी विभागाला माहिती देण्याचे आवाहन केले. याच्या सोबत तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा सेवा केंद्रांची आणि कृषी निविष्ठा गोदामांची भरारी पथकाद्वारे तपासणी सुरू आहे.

Protected Content

%d bloggers like this: