यावलमध्ये भीषण अपघात : एकाचा जागीच मृत्यु

यावल प्रतिनिधी ।  तालुक्यातील अंजाळे घाटात ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला असून या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला आहे.  याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, भालशिव तालुका यावल येथील राहणारे प्रदीप चावदस तायडे (वय-२९ वर्ष) हे दि.६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास भुसावळकडुन भालशिव या आपल्या गावी दुचाकी वाहन क्रमांक (एमएच १९डीएम९४२९) या वाहनाने जात असतांना भुसावळ रोडवरील अंजाळे घाटात समोर येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक( एमएच १९पी२९५३) वरील चालक ज्ञानेश्वर शिवराम कोळी राहणार चोरवड तालुका रावेर यांने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता समोरून येणाऱ्या प्रदीप चावदस तायडे हा ट्रॅक्टरखाली चेंगरल्याने गंभीर जखमी होवुन जावुन जागीच मृ्त्यु झाला आहे. याबाबत शांताराम चावदस तायडे रा भालशिव यांनी फिर्याद दिल्याने वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अजमल पठान हे करीत आहे .दरम्यान मयत प्रदीप तायडे याचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले .

 

Protected Content