Home क्राईम जळगावात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगावात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
72


जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा शहर पोलीस ठाण्यात तरूणाचा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागरात  राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. बुधवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास निलेश (पुर्ण नाव माहित नाही) याने मुलीच्या राहत्या घरातून फूस लावून पळवून नेले. मुलीच्या आईवडीलांनी नातेवाईक, मित्र आणि मैत्रिणीकडे शोधाशोध केली तर मुलगी मिळून आली नाही. शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि चंद्रकांत पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound