महिला बचतगट म्हणते सुप्त क्रांतीची चळवळ : पालकमंत्र्यांचे गौरवोदगार !

धरणगाव प्रतिनिधी । महिला बचत गट ही केवळ योजना नसून महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची एक सुप्त क्रांतिकारी चळवळ बनली आहे. बचत गटांमुळे महिलांमध्ये संघटनशक्ती, निर्माण झाली असल्याचे गौरवोदगार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची काढले. ते धरणगावात आयोजीत महिला बचत गट मेळाव्याच्या कार्यक्रमात बोलत होते.

 धरणगावात महिला बचत गटांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याला संबोधित करतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, महिला या उपजत बचत करणार्‍या असतात. घरातील खर्चाचे योग्य प्रकारे नियोजन करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असते. याच गुणाला महिला बचत गटांच्या माध्यमातून व्यापक स्वरूप मिळालेले आहे. यामुळे महिला बचत गटांची संकल्पना रुजल्यानंतर महिलांना महिलांचे एक वेगळे व्यासपीठ मिळाले आहे. त्यातून महिलांमध्ये जिज्ञासू भावना तयार झाली आहे. बचत गट हे महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल बनविण्यासाठी उत्तम संधी आहेत. रोजगार आणि आत्मसन्मान या दोन्ही चांगल्या गोष्टी बचत गटाच्या माध्यमातून एखादी स्त्री कमावू शकते. हे महिलांना रोजगार आणि आत्मसन्मान मिळवून देणारे व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन  ना. गुलाबराव पाटील यांनी केले.  या मेळाव्याला हजारो महिलांची उपस्थिती होती.

223 बचतगटांना 2 कोटी 49 लक्ष कर्ज मंजूर

तालुक्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने पंचायत समिती व संबंधित बँक यांनी  223 बचत गटांना  2 कोटी 49 लक्ष रकमेचे कर्ज मंजूर केले असून त्या सर्व बचत गटांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कर्ज मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, जि प सदस्य गोपाल चौधरी, भगवान महाजन यांनी मनोगत व्यक्त केली. बँकेचे विक्रमसिंग नेगी व अकबर बेपारे यांनी महिलांनी वेळेवेळी कर्ज फेडून उद्योग धंद्याला चालना देण्यासाठी बँक सतत सहकार्य करेल असे आश्वासन ही दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विस्तार अधिकारी पंजाबराव पाटील यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी संजय धनागर यांनी मानले.

कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ , प स सभापती मुकुंदराव नन्नवरे, जि प सदस्य गोपाल चौधरी, प्र. नगराध्यक्षा सौ. कल्पना महाजन, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, प्रेमराज पाटील, अनिल पाटील, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, सुरेश नाना चौधरी, अग्रणी बँकेचे अरुण प्रकाश, HDFC बँकेचे अकबर बेपारे, SBE बँकेचे विक्रमसिंग नेगी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी बँक व पंचायत समिती मार्फत किरण महाजन तालुका समन्वयक, चंद्रकांत सोनवणे तालुका व्यवस्थापक , हेमांगी टोकेकर, श्याम राठोड यांच्यासह पंचायत समिती व संबंधित बँकेचे अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content