यावल येथे ओबीसी आरक्षण हक्क परिषदेची आढावा बैठक; प्रतिभा शिंदे यांचे मार्गदर्शन

यावल प्रतिनिधी । यावल येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात ओबीसी आरक्षण हक्क परिषदेची आढावा बैठक लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक करीम सालार, अखिल भारतीय लेवा महासंघाचे अध्यक्ष विष्णु भंगाळे, सामाजीक कार्यकर्ते एजाज मलीक, आदीवासी तडवी भिल एकता मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एम.बी. तडवी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष निवृत्ती धांडे, मनसेचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, युवक राष्ट्रवादीचे अॅड. देवकांत पाटील, प्रशांत चौधरी, अमोल दुसाने, नरेंद्र पाटील, मोहन सपकाळे, भागवत आस्वार यांच्यासह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रतिभा शिंदे म्हणाल्या की,  देशात सर्व वर्गांना त्यांचा शैक्षणीक, आर्थिक व सामाजीक मागासलेपणावर आधारीत त्यांना शिक्षण, नोकरी व राजकीय क्षेत्रात समान संधी मिळाली पाहीजे, यासाठी आरक्षण देण्याची गरज आहे. म्हणुन आपल्याला या सर्व क्षेत्रामध्ये ओबीसी आरक्षण देण्यात आले आहे. मात्र याबाबत सातत्याने आपल्यावर अन्याय करण्यात आले आहे. आपल्या देशामध्ये १९३३ नंतर कुठलीही जातीनिहाय जनगणना आजपर्यंत करण्यात आलेले नाही. मंडल आयोगाने या १९३३ च्या जनगणनेनुसार आपले ओबीसी लोकसंख्येचे प्रमाण ५२  टक्के धरण्यात आले आहे. यात ओबीसीचे आरक्षण हे २७ टक्के असून अन्याय करून ही ओबीसी समाजाचे हे आरक्षण कसे कमी करता येईल. याबाबत दोन टक्के जाती असलेल्या समाजाकडून करण्यात येत आहे. असे सांगितले.

त्यापुढे म्हणाल्या की, शनिवारी २५ सप्टेंबर रोजी जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाटयगृहात ओबीसी आरक्षण हक्क परिषद आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ऑल इंडीया मुस्लीम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, आमदार कपील पाटील यांच्यासह आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी एम बी तडवी यांनी ही आपले विचार मांडले .

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!