बेकायदेशीर शिक्षकेतर भरती प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । येथील नगरपालीका व्दारे संचलीत साने गुरुजी माध्यमीक व उच्च माध्यमीक विधालयातील झालेली बेकाद्याशीर करण्यात आलेली शिक्षकेतर भरती रद्द करण्यात येवुन, आपल्या पदाचा दुरुपयोग करणार्‍या शालेय शिक्षण समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार पारिषदेत केली आहे.

यावल येथील नगरसेवक अतुल पाटील यांच्या फर्म हाऊस वर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगीतले की नगर पालीकेद्वारे संचलीत साने गुरुजी माध्यमीक व उच्च माध्यमिक विधालयात चे शालेय समितीचे सभापती दिपक रामचंद्र बेहडे व शालेय समितीचे सचिव एस.आर. वाघ ( मुख्याध्यापक) यांनी संगनमत करून शिक्षक भरती साठी आवश्यक असलेले शिक्षण विभागाचे नियम धाब्यावर ठेवुन आर्थिक लाभासाठी शिक्षण विभागाची परवानगी न घेता दिनांक २३ / २/२०१९ रोजीच्या दोन वर्तमान वृतपत्रात कनिष्ठ लिपीक ( १)व प्रयोगशाळा सहाय्यक (३ ) अशा एकूण चार पदांसाठी अनधिकृतपणे जाहीरात प्रसिद्ध करून दिनांक ०८/ ३ / २०१९ रोजी मुलाखतीसाठी बोलावुन त्यांचा लेखी आणी तोंडी मुलाखती घेतल्या आहे.

अतुल पाटील पुढे म्हणाले की, साने गुरुजी माध्यमीक व उच्च माध्यमिक विधालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष दिपक रामचंद बेहडे व मुख्याध्यापक एस.आर. वाघ यांनी केलेल्या मुलाखतीच्या वेळी उपस्थित राहण्याच्या विनंतीस स्विकारून आम्ही दिनांक ८ मार्च २०१९ रोजी शिक्षकेतर कर्मचारी भरती मुलाखतीस उपस्थित होतो, आपण सदरच्या या शिक्षकेतर भरती संदर्भात आपण शासनाची परवानगी घेतली आहे का अशी विचारणा शालेय समितीच्या अध्यक्ष व मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता परवानगी घेतली असल्याचे त्यांनी होय सांगीतले. या शासन परवानगी चे आपण पत्र मागीतले असता मुलाखती आलेल्या उमेदवारांची गर्दी आहे नंतर आपणास हे पत्र दाखवु असे म्हणाले. मात्र आपण प्रत्यक्षात जिल्हा परिषद जळगाव च्या शिक्षण विभागाकडे या भरती प्रक्रीये संदर्भात कुठलीही परवानगी दिलेली नसल्याची माहीती समोर आली आहे. या अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन केल्या शिवाय शिक्षण विभाग परवानगी देवु शकत नाही असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. अशा कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रीया पुर्ण केली नसतांना शालेय समितीचे अध्यक्ष दिपक रामचंद्र बेहडे यांनी आपले आर्थीक स्वार्थ साध्य करण्यासाठी बेकाद्याशीररित्या वर्तमान पत्रात जाहीरात प्रसिद्ध करुन नोकरी लावण्याचे लावण्याच्या नावाखाली आर्थीक स्वार्थासाठी बेरोजगार तरुणांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस झाले आहे. खर तर विद्यालयाचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष नगरसेवक दिपक रामचंद्र बेहडे यांच्या कडून दिनांक ९ मार्च किंवा १० मार्चची बोगस बैठक दाखवुन मुलाखतीला आलेल्या उमेदवारांना नोकरीचे नियुक्त पत्र देण्यासाठी मोठा आर्थीक व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी शिक्षण अधिकारी यांनी तात्काळ शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवुन केलेली बेकायदेशीर झालेली ही शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती प्रक्रीया रद्द करावी आणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता देशात लागली असतांना आचार सहींतेचे भंग करून शिक्षकेतर कर्मचारी भरतीत गैरकृत करणारे साने गुरुजी माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालयाचे शालेय समिती चे अध्यक्ष दिपक रामचंद्र बेहडे व समिती चे सचिव मुख्याध्यापक एस.आर. वाघ यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक अतुल वसंत पाटील यांनी पत्रकार पारिषदेद्वारे केली आहे. या पत्रकार परिषदेत नगर पालीकेचे उपनगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते, नौशाद मुबारक तडवी, शेख असलम शेख नबी, सौ. रुख्माबाई नथ्थु भालेराव, उपस्थित होते.

Add Comment

Protected Content