बापरे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील एका गावातल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावातुन १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तरूणाने अपहरण करून तिला आपल्या एका नातेवाईकाच्या मदतीने नासिक येथे घेवून गेला आपल्या नातेवाईक घरी तिच्यावर लैगीक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस दिनांक २७ एप्रील रोजी गावातील चंदकांत सोनवणे यांने आसोदा तालुका जिल्हा जळगाव येथील महेन्द्र कोळी मुलीचे अपहरण करुन नासिक येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी घेवुन जावुन तिच्यावर लैंगीक अत्याचार केले . अत्याचारीत अल्पवयीन मुलीगी ही दिनांक १ मे रोजी आपल्या घरी परतल्याचे सदरच्या झालेल्या प्रकाराबद्दल त्या मुलीने आपल्या कुटुंबास सांगीतले. यानुसार पोलीसांनी गावातील चंद्रकांत सोनवणे व मुलीला ताब्यात घेतले असता मुलीने दिलेल्या माहीती वरून सदरची घटना समोर आली असुन, पोलिसांनी चार जणांविरूध्द बालकांचे लैगीक अत्याचार पासुन सरंक्षण कायदा पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी चंद्रकांत सोनवणे यास अटक करण्यात आली असून अन्य तिघा संशयीत आरोपींच्या शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर, सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: