आदिवासी वस्तीवर कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने येथील तालुका विधी सेवा समितीच्या वतीने तालुक्याचे उत्तर सीमेवरील सातपुड्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या मोहमांडली व चारमळी येथे आदिवासींसाठी कायदेविषयक माहिती जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.

या शिबीराच्या अध्यक्षस्थानी येथील न्यायाधीश मनोज बनचरे होते. यावल पूर्व विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, सहाय्यक सरकारी वकील फरीद शेख हे उपस्थित होते. यावल वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ अजय कुलकर्णी, यावल वनक्षेत्र कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच यावल न्यायालयातील कनिष्ठ लिपीक गजानन लाड यांनी सदर अतिदुर्गम भागात जावून वृक्षारोपणाचा व सदर भागातील रहिवासी यांना कायदेविषयक माहिती जनजागृती शिबीर याबाबत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

 शिबिरात न्यायाधीश मनोज बनचरे यांनी ‘सदर रहिवाशांना मुलभुत हक्क तसेच जीवनावश्यक कायदे व नियम’ याबाबत तर वनअधिकारी विक्रम पदमोर यांनी ‘वनसंरक्षण व सामाजिक जीवन’ आणि सहाय्यक सरकारी वकील फरीद शेख यांनी ‘शिक्षण अभियाना’विषयी मार्गदर्शन केले. अॅड. अजय कुलकर्णी यानी ‘मोटर वाहन कायदा व नियम’ याबाबतची माहिती सांगितली.

Protected Content